> MPSC/UPSC: 2013

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

राज्यशास्त्र प्रश्न संच १
१.घटक राज्यांना जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी या साठी कोणत्या राज्याने राज् मन्नार कमिशन नेमले होते  ?

अ .तामिळनाडू

ब .कर्नाटक

क .पश्चिम बंगाल

ड केरळ

उत्तर
अ तामिळनाडू 

२. राज्यपालांना निवृत्तीनंतर फायद्याचे दुसरे पद देवू नये अशी शिफारस कोणी केली ?

 अ राज मन्नार आयोग

ब. सरकारिया आयोग

क पश्चिम बंगाल सरकारचे निवेदन

ड सेटलवाड समिती
उत्तर
ब सरकारिया आयोग 

३. कलम ----- नुसार न्यायालयाच्या निर्णयावर संसदेत किंवा बाहेर प्रतिकूल भाष्य करता येत नाही 

 अ १२६

ब .१२७

क १२८

ड १२९

उत्तर
ड १२९

 
४. घटनेचा फेरविचार करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी --------------- आयोग स्थापन केला 

 अ.न्या. विश्वेशरय्या

ब .न्या.  व्यंकट चेलय्या

क न्या. पंछी आयोग

ड यापैकी नाही
उत्तर
ब न्या व्यंकट चेलय्या 

५ पश्चिम बंगाल सरकारने केंद्र राज्य संबंधाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्राला १९७७ साली निवेदन सदर केले त्यात खालील कशाचा समावेश नव्हता ?

 अ कलम २४८ नुसार केंद्राला दिलेले शेशाधिकार राज्यांना द्यावेत

ब घटनेच्या उद्देश पत्रिकेत आणि पहिल्या कलमात दुरुस्ती करून 'संघराज्य हा शब्द टाकावा

क कलम २०० आणि २०१ रद्द करावे

ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे

उत्तर
ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे 
 

६.राष्ट्रपती घटनेतील कोणत्या कलमानुसार आंतरराज्यीय परिषद नेमू शकतो ?

 अ.२४२

ब .२६३

क २६८

ड २७२
उत्तर
ब २६३
 
७  कलम -------- नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते  

 अ २८२

ब .२८६

क २८८

ड २९०
उत्तर
अ २८२
 
८ राज्यासुचीतील विषयांवर कायदे करण्याच्या केंद्राच्या अधिकाराबाबत खालील विधानांचा विचार करा 
I . कलम २४९ अन्वये राष्ट्रीय हितासाठी राज्य् सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा ठराव राज्यसभेने २/३ बहुमताने संमत केल्यास संसद त्यावर कायदा करू शकते
II कलम २५१ अन्वये समान विषयावरील संसदेच्या कायद्यास राज्यापेक्षा जास्त महत्त्व आहे

 अ. फक्त विधान I बरोबर

ब.फक्त विधान II बरोबर

क.वरील दोन्हीही विधाने बरोबर

ड.वरील दोन्हीही विधाने  चुकीचे
उत्तर
क वरील दोन्हीही विधाने बरोबर 
 
९.' संपूर्ण देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्र एकात्म ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे ' या विधानाचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा 

 अ.राज्यघटनेत असा कोठेही उल्लेख नाही

ब.कलम ३५५ मध्ये हे विधान आहे

क कलम २०८मध्ये हे विधान आहे

ड.कलम २७० मध्ये हे विधान आहे
उत्तर
ब कलम ३५५ मध्ये हे विधान आहे 

१०.वृत्त पत्र आणि मुद्रणालये हा विषय ---------- सूचित आहे 

 अ केंद्रसुची

ब. राज्य् सूची

क.समवर्ती सूची
 
ड शेषाधिकार
उत्तर
क समवर्ती सूची 
 

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ६.१.खालील पैकी कोणाला रावबहाद्दूर हि पदवी इंग्रजांनी दिली ?

अ .दादोबा पांडुरंग तर्खडकर

ब .लोकहितवादी

क .वरील दोन्हीही

ड वरील पैकी नाही

उत्तर
क वरील दोन्हीही 

२. आचार्य अत्रे यांनी मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला संबोधले?

 अ जगन्नाथ शंकरशेठ

ब .भाऊ दाजी लाड

क बाळशास्त्री  जांभेकर

ड रा. गो भांडारकर
उत्तर
अ जगन्नाथ शंकरशेठ 

३.धन्वंतरी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला ओळखले जाते ?

 अ वि.रा. शिंदे

ब .महर्षी कर्वे

क जगन्नाथ शंकरशेठ

ड भाऊ दाजी लाड
उत्तर
ड भाऊ दाजी लाड 
 
४. भिक्षुक या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

 अ.रा. गो भांडारकर

ब .लोकहितवादी

क महात्मा फुले

ड विष्णुबुवा ब्रह्मचारी
उत्तर
ब लोकहितवादी 

५ सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक कोणाला मानतात ?

 अ लोकहितवादी

ब महात्मा फुले

क गोपाल गणेश आगरकर

ड महर्षी कर्वे

उत्तर
अ लोकहितवादी 
 

६.लायसेन्स बिलाचा व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून कोणी विरोध केला ?

 अ.भाऊ महाजन

ब .भाऊ दाजी लाड

क जगन्नाथ शंकरशेठ

ड यापैकी नाही
उत्तर
ब भाऊ दाजी लाड 
 
७  विष्णु बुवांनी --------------या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. 

 अ वर्तमान दीपिका .

ब .प्रभाकर

क जातीभेद

ड वेद धर्म
उत्तर
अ वर्तमान दीपिका 
 
८ प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा करताना प्लेग होवून कोणत्या समाज सुधारकाचा  मृत्यू झाला ?

 अ. बाबा पदमनजी

ब.भाऊ दाजी लाड

क.सावित्रीबाई  फुले

ड.सार्वजनिक काका
उत्तर
क सावित्रीबाई फुले 
 
९.  सेवा सदन ची स्थापना कोणी केली ?

 अ. पंडिता रमाबाई

ब.बेहरामजी मलबारी

क न्यायमूर्ती रानडे

ड.धोंडो केशव कर्वे
उत्तर
ब बेहरामजी मलबारी 

१०.'सुबोध पत्रिका ' द्वारे कोणत्या समाजाच्या विचारांचा प्रसार केला जात असे  ?

 अ.आर्य समाज

ब. सत्यशोधक समाज

क.ब्राम्हो समाज
 
ड प्राथर्ना समाज
उत्तर
ड प्राथर्ना समाज 

 

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ५

१.मानवाला शेतीचा शोध कोणत्या काळात लागला ?
अ .पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क .मध्याश्म युग

ड .इतिहासपूर्व काळ

उत्तर
क मध्याश्म युग 

२. मानव ------------- काळात मूर्ती पूजक बनला. 
 अ पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क मध्याश्म युग

ड इतिहासपूर्व काळ
उत्तर
ब नवाश्म युग 

३.खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ?

 अ सिंधू संस्कृती हि कास्ययुगीन संस्कृती आहे

ब .सिंधू संस्कृती हि नागरी आणि व्यापारी संस्कृती आहे

क सिंधू संस्कृतीत मंदिरांचा अभाव आहे

ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते
उत्तर
ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते ,{ त्यांना लिपीचे ज्ञान होते पण त्या लिपीचा उलगडा झाला नाही ती चित्रलिपी होती }
 
४. नाशिक प्रशस्ती मध्ये कोणाचे वर्णन 'त्रीसमुद्रतोयपीतवाहन 'असे करण्यात आले आहे ?

 अ .सातकर्णी प्रथम

ब .गौतमीपुत्र सातकर्णी

क यज्ञश्री सातकर्णी

ड राजा हाल
उत्तर
ब गौतमीपुत्र सातकर्णी 

५ सातवाहन काळात उत्पन्नाच्या ----- भाग भूमिकर म्हणून शेतकरी राजाला देत. 

 अ १/३

ब १/५

क २/३

ड १/१०

उत्तर
ड १/१०
 

६. कवी कालिदासाने अनेक वर्षे ---------- कडे वास्तव्य केल्याने मेघदूत ची रचना केली 

 अ .सातवाहन

ब .वाकाटक

क राष्ट्रकुट

ड शिलाहार
उत्तर
ब वाकाटक 
 
७  गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम कोणी प्रकाश टाकला ?

 अ .एफ. लिबी

ब .ग्रेन्ड डफ

क ल्युसी स्मिथ

ड व्हिसेंट स्मिथ
उत्तर
क ल्युसी स्मिथ 
 
८ ' चतुर्वर्ग चिंतामणी ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 अ. बोपदेव

ब. कृष्णदेव

क भास्कराचार्य

ड हेमाद्री
उत्तर
ड हेमाद्री 
 
९. शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर कोणी बांधले ?

 अ. भिल्लम पाचवा

ब .कृष्णदेव

क सिंघण द्वितीय

ड रामचंद्र
उत्तर
क सिंघण द्वितीय 

१०. यादव काळात महाराष्ट्रात कोणता उद्योग सुरु होता ?

 अ कापड शिवणे

ब. तेल गाळणे

क बैलगाड्या बनविणे
 
ड वरील सर्व
उत्तर
ड वरील सर्व 

 

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ४
१. बुद्धाच्या काळात कापड तयार करण्याचे प्रमुख केंद्र कोणते होते   ?
अ .अयोध्या

ब .चंपा

क काशी

ड .पाटलीपुत्र

उत्तर
क काशी 

२. मगधच्या कोणत्या राज्याने प्रथम स्वत:चे खडे सैन्य उभे केले म्हणून त्याला सेनिय असे म्हटले असावे ?

 अ चंद्रगुप्त मौर्य

ब . बिंम्बिसार

क अशोक

ड यापैकी नाही
उत्तर
ब बिंम्बिसार 

३.  प्राचीन भारतात गणराज्य पद्धतीत राजधानीच्या ठिकाणी एक आम सभा असे तिला ---------- म्हणतात 
 अ सभा

ब समिती

क संथागार

ड गण परिषद
उत्तर
क संथागार  

४.  १८३७ मध्ये अशोकाचा ब्राम्ही लिपीतील शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन कोणी केले ?
 अ .जेम्स प्रिन्सेप

ब .स्टूअर्त क्लार्क

क जेम्स मिल

ड एच. एच. विल्सन
उत्तर
अ जेम्स प्रिन्सेप 

 
५ श्रीनगर शहर कोणी वसविले  ?
 अ .चंद्रगुप्त मौर्य

ब .बिम्बिसार

क कनिष्क

ड अशोक
उत्तर
ड अशोक 

६.मौर्यकालीन प्रशासन व्यवस्थेत बाजाराच्या अधीक्षकाला ----------- म्हणत असत 

 अ पन्याध्यक्ष

ब पौतावाध्यक्ष

क आकाराध्यक्ष

ड संस्थाध्यक्ष
उत्तर
ड संस्थाध्यक्ष 

७ मौर्य काळात शिल्पे अलंकार भांडी खेळणी बनविण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जात असे  ?
 अ. दगड

ब .लाकूड

क चुना

ड माती
उत्तर
ड माती 

८ सम्राट कनिष्काची राजधानी कोणती होती ?

 अ .मथुरा

ब .श्रीनगर

क पुरुषपुर

ड लाहोर
उत्तर
क पुरुषपुर 

९.कलिंग चा राजा खारवेल --------- धर्माचा अनुयायी होता 

 अ वैदिक

ब . जैन

क बौद्ध

ड हिंदू
उत्तर
ब जैन 

१०. मान्सून वाऱ्यांचा शोध हिप्पालस नावाच्या ग्रीक दर्यावर्द्याला कधी लागला ?
 अ  इ स ४६

ब .इ स १०२

 क इ स पु १२

ड इ स १७२
उत्तर
अ इ स ४६
 

 

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

अर्थशास्त्र प्रश्नसंच 2१.खालील कोणत्या धोरणांचा अवित्तीय धोरणात समावेश होतो  ?
अ .किंमतविषयक धोरण

ब . मजुरीविषयक  धोरण

क .सामाजिक सुरक्षिततेविषयी धोरण

ड .वरील सर्व

उत्तर
ड वरील सर्व 

२. भारतीय घटनेच्या ------- कलमानुसार संचित निधी उभारलेला आहे  ?
 अ २६६/१

ब . २६६/२

क २६७

ड यापैकी नाही
उत्तर
अ २६६/१, २६६/२ नुसार लोक खाते तर २६७ नुसार आकस्मिक निधी उभारला जातो 

३. निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्याचे काम केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या कोणत्या शाखेद्वारे केले जाते ?
 अ .आस्थापना विभाग .

ब .महालेखा पाल

क नियोजन विभाग  १

ड नियोजन विभाग २
उत्तर
ब महा लेखापाल 

४. ज्या वस्तूंची किंमत वाढली असता मागणी वाढते अशा वस्तूंना ------ वस्तू म्हणतात . 
 अ .गुण वस्तू

ब .सामुहिक वस्तू

क गीफेन वस्तू

ड सामाजिक वस्तू
उत्तर
क गिफेन वस्तू 

५ १९९४-१९९५ पासून -------- समितीच्या शिफारशीनुसार सेवांवर कर आकारला जातो ?
 अ .राजा चेलय्या .

ब .महावीर त्यागी

क राज समिती

ड विजय केळकर
उत्तर
अ राजा चेलय्या 

६.भारतात आयकर भरणाऱ्या व्यक्ती एकून लोकसंख्येच्या ------------ आहे 
 अ .२. ५ % पेक्षा कमी

ब . २. ५ ते ५ % दरम्यान

क ५ ते ७. ५ % दरम्यान

ड १० ते १२% दरम्यान
उत्तर
अ २. ५ % पेक्षा कमी 

७ विक्रीकर संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे  ?
 अ ..केरळ

ब .गुजरात

क तामिळनाडू

ड महाराष्ट्र
उत्तर
ड महाराष्ट्र 

८ सेवांवर कर आकारणी कोण करू शकते ?
 अ .फक्त केंद्र सरकार

ब .फक्त राज्य सरकार

क केंद्र  आणि राज्य सरकार

ड स्थानिक स्वराज्य संस्था
उत्तर
अ फक्त केंद्र सरकार 

९. सार्वजनिक आय व्ययात कोणती बाब महत्त्वाची असते  ?
 अ सार्वजनिक उत्पन्न

ब . सार्वजनिक खर्च

क व्यवहार तोल

ड व्यापार तोल
उत्तर
ब सार्वजनिक खर्च 

१०. निष्पादन अर्थसंकल्प सर्व प्रथम --------------- राज्याने मांडला . 
 अ .महाराष्ट्र

ब .कर्नाटक

क गोवा

ड राजस्थान
उत्तर
अ महाराष्ट्र 

 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अर्थशास्त्र प्रश्नसंच ११.बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेत सुरु झाला  ?
अ .दुसऱ्या

ब .चवथ्या

क .सहाव्या

ड .सातव्या

उत्तर
क  सहाव्या 

२. रोजगार निर्मिती जनक योजना कोणत्या योजनेला म्हणता येईल  ?
 अ .तिसऱ्या .

ब .सातव्या

क नवव्या

ड अकराव्या
उत्तर
ब सातव्या 

३. कोणती योजना यशस्वी झाली नाही असे म्हणता येईल   ?
 अ पहिली

ब .तिसरी

क सहावी

ड दहावी
उत्तर
अ तिसरी 

४. नवव्या पंच वार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणते  ?
 अ .सामाजिक न्याय आणि समते सह आर्थिक विकास .

ब .सर्वंकष विकास

क दरिद्र निर्मुलानातून पूर्ण रोजगाराकडे

ड यापैकी नाही
उत्तर
अ सामाजी न्याय आणि समते सह आर्थिक विकास 

५ सरकती योजना हि संकल्पना --------- यांनी मंडळी 
 अ .प्रा राग्नार .

ब गुन्नार मिर्दाल

क अशोक रुद्र

ड प्रा लाकडवाला
उत्तर
ब गुन्नार मिर्दाल 

६.भिलाई पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने सुरु करण्यात आला  ?
 अ जर्मनी .

ब .फ्रान्स

क रशिया

ड इंग्लंड
उत्तर
क रशिया 

७ १९६६ ते १९६९ दम्यान तीन वार्षिक योजनांचा मुख्य भर कशावर होता  ?
 अ .कृषी उत्पन्न वाढ .

ब .स्वावलंबन

क परकीय व्यापार वृद्धी

ड उद्योग क्षेत्रात वृद्धी
उत्तर
ब स्वावलंबन 

८ बेकारी हटाव हि घोषणा कधी करण्यात आली ?
 अ ..१९८४

ब .१९८७

क १९८८

ड १९८२
उत्तर
क १९८८

९. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना कधी सुरु करण्यात आली ?
 अ १९९८

ब . २००२

क २००६

ड २००८
उत्तर
अ १९९८

१०. २० कलमी कार्यक्रम  सर्वप्रथम कधी सुरु करण्यात आला  ?
 अ .१९७७.

ब .१९७४

क १९७८

ड १९७९
उत्तर
क १९७८ 


 

 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच १,
१.१९३९ साली अखिल भारतीय संस्थानिक प्रजेचे अधिवेशन लुधियाना येथे भरले तिचे अध्यक्ष कोण होते ?
अ .महात्मा गांधी

ब .पंडित नेहरू

क .स्वामी रामानंद तीर्थ

ड .वल्लभभाई पटेल

उत्तर
ब .पंडित नेहरू

२. स्वातंत्र्यपूर्व काळात बळवंत राय मेहता यांनी कोणत्या संस्थानात कार्य केले ?
 अ जुनागड..

ब .हैद्राबाद

क पतियाला

ड राजकोट
उत्तर
ड राजकोट

३.हैद्राबाद संस्थानातील एकून जमिनीपैकी ----------% जमीन निजामाच्या जमीनदारी मालकीची होती ?
 अ .१०.

ब .२०

क ३०

ड ४०
उत्तर
अ .१०

४. १९३८ साली निजाम संस्थाचे पंतप्रधान कोण होते?
 अ .उस्मान अली खान.

ब .रोशन अली खान

क अकबर हैदरी

ड झुल्फिकार खान
उत्तर
क अकबर हैदरी

५ स्वामी  रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद संस्थानात कोठे राष्ट्रीय धर्तीची शाळा स्थापन केली ?
 अ .औरंगाबाद.

ब उमरगा

क हैद्राबाद

ड मोमिनाबाद
उत्तर
ड मोमिनाबाद

६. ' मेमोयार्स ऑफ हैद्राबाद स्ट्रग ल ' या ग्रंथ कोणी लिहिला?
 अ .स्वामी रामानंद तीर्थ.

ब .बी. एल्ला रेड्डी

क रवी नारायण रेड्डी

ड महात्मा गांधी
उत्तर
अ .स्वामी रामानंद तीर्थ.

A १९२७ मध्ये अखिल भारतीय प्रजा परिषद भरविण्यात आली

R १९२० मध्ये सुरु झालेल्या असहकार चळवळ आणि खिलापत चळवळ यामुळे अनेक संस्थांनी प्रजाजनांच्या स्थानिक संघटना स्थापन झाल्या

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.


A १२ सप्टे . १९३८ रोजी राजकोट संस्थांच्या दिवाण पदी केंडल या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक  झाली


R राजकोट संस्थान चे दिवाण विरवाला यांनी राष्ट्रीय काँग्रेस च्या भूमेकाला सक्रीय पाठींबा दिला

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

९.
A गांधीजींनी राजकोट संस्थान मधील आंदोलन  मागे घेतले

R  राजपूत आणि मुसलमानांनी गांधीजींच्या राजकोट येथील प्राथना सभातून निदर्शने केली

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

१०.
A डिसे १९३८ मध्ये गांधीजींनी हैद्राबाद संस्थानात चाललेला सत्याग्रह मागे घेतला

R त्याच  कांग्रेस सत्याग्रहाच्या बरोबरीने आर्य समाज सत्याग्रह करीत होता.

 अ विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे..

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे
 
ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
अ विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे..

 

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

भूगोल प्रश्नसंच १


१.वाळूचे दांडे आणि सागरकिनारा यांच्या दरम्यान खाऱ्या पाण्याचे लांबट परंतु उथळ सरोवर निर्माण होते त्यास खाजान म्हणतात खालीलपैकी कोणती सरोवरे त्याची उदाहरणे आहेत ?
?

अ .चिल्का

ब .पुलीकत

क .दोन्ही

ड .एकहि नाही

उत्तर
क .दोन्ही

२. थाग- ला हि खिंड कोणत्या राज्यात आहे ?
 अ सिक्कीम..

ब .उत्तराखंड

क जम्मू काश्मीर

ड अरुणाचल प्रदेश
उत्तर
ब .उत्तराखंड

३. धवलधर रांगा कोणत्या राज्यात आहे?
 अ .जम्मू काश्मीर.

ब .उत्तरखंड

क हिमाचल प्रदेश

ड मेघालय
उत्तर
क हिमाचल प्रदेश

४. केंद्रीय जल आयोगाने १ ९ ५ ६ साली देशातील पहिले पूर अंदाज केंद्र कोणत्या शहरात केली?
 अ कोलकाता..

ब .नवी दिल्ली

क देहरादून

ड मुंबई
उत्तर
ब .नवी दिल्ली

५गाळना डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?
 अ धुळे..

ब .बुलढाणा

क यवतमाळ

ड सातारा
उत्तर
अ धुळे

६. रोलिंग शोलाजू हि महत्त्वपूर्ण गवताळ प्रदेश परिसंस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
 अ पश्चिम घाट

ब .अंदमान निकोबार बेटे

क ईशान्य भारत

ड पूर्वांचल
उत्तर
 अ पश्चिम घाट

७ मदुमलाई हे तामिळनाडू राज्यातील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
 अ वाघ..

ब .हत्ती

क गेंडा

ड हरीण
उत्तर
ब .हत्ती

८ बांदीपूर अभयारण्यातून कोणती नदी वाहते ?
 अ .कृष्णा.

ब .कावेरी

क गोदावरी

ड मोयार
उत्तर
ड मोयार

९. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान किती आहेत ?
 अ तीन..

ब चार.

क पाच

ड सहा
उत्तर
क पाच

१०. जागतिक वन्यजीव कोष या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
 अ स्वित्झर्लंड..

ब ग्रेट ब्रिटन.

क जर्मनी

ड इटली
उत्तर
अ स्वित्झर्लंड

 

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

भूगोल प्रश्नसंच २


१.सर्वाधिक ई-कचरा उत्पादित करणारे राज्य कोणते ?
अ तामिळनाडू .

ब .कर्नाटक

क हरियाना.

ड महाराष्ट्र.

उत्तर
ड महाराष्ट्र

२. खालील कोणत्या प्रदूष कामुळे दृष्टी दोष निर्माण होतात ?
 अ .सल्फर डाय ऑक्साईड.

ब नायट्रोजन डाय ऑक्साईड.

क कार्बन मोनो ऑक्साईड

ड शिसे
उत्तर
क कार्बन मोनो ऑक्साईड

३.डिक्लोफेनिक  हे औषध साधारणपणे पक्ष्यांकारिता फारसे घातक नसते परंतु अलीकडील काळात खालीलपैकी कोणत्या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने भारत सरकारने सदर औषधावर बंदी घातली आहे ?
 अ पोपट..

ब .कबुतर

क मोर

ड गिधाड
उत्तर
ड गिधाड

४. देवमाली हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
 अ छत्तीसगड

ब .पश्चिम बंगाल

क अरुणाचल प्रदेश

ड तामिळनाडू
उत्तर
क अरुणाचल प्रदेश

५ तराई आर्क हि योजना २००८ मध्ये सुरु करण्यात आली हि योजना कोणत्या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरु करण्यात आली ? ?
 अ .वाघ.

ब .हत्ती

क सिंघ

ड नील वानर
उत्तर
अ .वाघ

६.आंतरराष्ट्रीय प्रवाळ भित्ती वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले ?
 अ २००६..

ब २००८.

क २०१०

ड २०१२
उत्तर
ब २००८

७ चुकीची जोडी शोधा ?
 अ .पर्यावरण संरक्षण अधिनियम  : १९८६.

ब .वन्यजीव संरक्षण कायदा         :१९८०

क हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा :१९८१

ड जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा   :१९७४
उत्तर
ब .वन्यजीव संरक्षण कायदा         :१९८०

८ सुपर सोनिक विमानातील इंधनाच्या ज्वलनाने तयार होणारा खालीलपैकी कोणता वायू ओझोन वर तात्काळ परिणाम करतो ?
 ?
 अ क्लोरीन..

ब .सल्फर डाय ऑक्साईड

क नायट्रोजन ऑक्साईड

ड क्लोरो फ्लुरो कार्बन
उत्तर
क नायट्रोजन ऑक्साईड

९.भारतात १९८६ साली ------------------ अणुभट्टीत अपघात होवून किरणोत्सारी पाण्याची गळती झाली ?
 अ ..कल्पकम

ब .काक्रापरा

क नरोरा

ड तारापूर
उत्तर
ड तारापूर

१०. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
 अ .काझीरंगा.

ब .जिम कार्बेट

क चांदोली

ड कान्हा
उत्तर
ब .जिम कार्बेट

 

भूगोल प्रश्नसंच ३


१येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
अ पूर्णा .

ब वर्धा.

क तापी.

ड पैनगंगा.

उत्तर
अ पूर्णा 

२. जेलेप- ला हि खिंड भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे?
 अ .चीन.

ब .नेपाल

क भूटान

ड बांगलादेश
उत्तर
क भूटान

३. आचारा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
 अ सिंधुदुर्ग..

ब .ठाणे

क रायगड

ड रत्नागिरी
उत्तर
अ सिंधुदुर्ग

४.झर्लीना हि अणुभट्टी कोणत्या अणुशक्ती केंद्रात आहे?
 अ .ट्रोम्बे.

ब . तारापूर

क उमरेड

ड यापैकी नाही
उत्तर
अ .ट्रोम्बे.

५ महाराष्ट्रात संगमरवर कोणत्या जिल्ह्यात आढळतो?
 अ .नागपूर.

ब .गोंदिया

क चंद्रपूर

ड यवतमाळ
उत्तर
अ .नागपूर

६. भारतातील एकून मेंग्नीज साठ्यांपैकी -------% साठे महाराष्ट्रात आढळतात?
 अ .५०.

ब .४०

क ३०

ड २०
उत्तर
ब .४०

७ प्रचंडगड हे कोणत्या किल्ल्याचे नाव आहे ?
 अ .रायगड.

ब .सिंहगड

क विशालगड

ड तोरणा
उत्तर
ड तोरणा

८ पवन उर्जा उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे?
 अ .महाराष्ट्र.

ब .तामिळनाडू

क कर्नाटक

ड राजस्थान
उत्तर
अ .महाराष्ट्र

९.महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीच्या दृष्टीने चढता क्रम लावा?
 

 अ .सप्तशृंगी, महाबळेश्वर, तोरणा, कळसुबाई.

ब .सप्तशृंगी, तोरणा, महाबळेश्वर,  कळसुबाई

क तोरणा, महाबळेश्वर, सप्तशृंगी, कळसुबाई

ड तोरणा, सप्तशृंगी, महाबळेश्वर, कळसुबाई
उत्तर
ड तोरणा, सप्तशृंगी, महाबळेश्वर, कळसुबाई

१०. हिंदी महासागरातील 'दि एगो गार्शिया ' या अति लहान बेटावर कोणत्या राष्ट्राने आपला लष्करी तळ उभारला आहे ?
 

 अ रशिया..

ब .चीन

क अमेरिका

ड फ्रान्स
उत्तर
क अमेरिका

 

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच २

१.प्रसिद्ध गायक बैजू बावरा खालीलपैकी कोणाच्या दरबारात होता ?
अ अकबर .

ब राम निरंजन सिंघ .

क मानसिंग तोमर .

ड महंमद शाह

उत्तर
क मानसिंग तोमर 

२. अल्ला रखा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे?
 अ .संतूर.

ब .तबला

क वीणा

ड पक्वाज
उत्तर
ब .तबला

३.ठुमरीचे जन्मस्थान कोणते ?
 अ लखनौ..

ब .ग्वाल्हेर

क जयपूर

ड दिल्ली
उत्तर
 अ लखनौ..

४. १९२६ साली मौरीस कॉ लेज ऑफ मुझिक ची स्थापना कोणत्या शहरात झाली ?
 अ .मुंबई.

ब हैद्राबाद.

क विजापूर

ड लखनौ
उत्तर
ड लखनौ

५ अमेरिकी नृत्यांगना शेरोन लॉवेन कोणत्या भारतीय नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे
?

 अ कुचीपुडी..

ब .ओडिसी

क कथकली

ड भरत नाट्यम
उत्तर
ब .ओडिसी

६. प्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांनी कोणता नृत्यप्रकार लोकप्रिय केला?
 अ .मोहिनीअट्टम.

ब .भरतनाट्यम

क कथकली

ड ओडिसी
उत्तर
अ .मोहिनीअट्टम

७ सुसिनी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार ?
 अ .कर्नाटक.

ब .मिझोरम

क राजस्थान

ड जम्मू काश्मीर
उत्तर
क राजस्थान

८ तमिळनाडूत मुलींच्या कडून छडीच्या सहाय्याने नृत्य केले जाते त्याला -------- म्हणतात
 अ .करगम.

ब कोलट्टम.

क कुम्मी

ड कावडी
उत्तर
ब कोलट्टम

९. उरुभंगम या नाटकात दुर्योधना चा मृत्यू दाखविला गेला आहे ते कोणी लिहिले ?
 अ .भास.

ब कालिदास.

क विशाखा दत्त

ड भवभूती
उत्तर
 अ .भास.

१०. ययाती या नाटकाचे नाटककार कोण?
 अ .वि.  स.  खांडेकर.

ब .गिरीश कर्नाड

क विजय तेंडूलकर

ड हबीब तन्वीर
उत्तर
ब .गिरीश कर्नाड

 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

इतिहास प्रश्नसंच ३ , 

1.खालील पैकी  कोणत्या भारतीय सत्ताधीशाने सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला ?
अ .दुसरा बाजीराव पेशवा

ब .हैदराबादचा निजाम

क .अयोध्ये चा नबाब

ड .कर्नाटकचा नबाब

उत्तर
ब .हैदराबादचा निजाम

2. जाने. १८०६ मध्ये कंपनी ने होळकरांबरोबर ------------येथे शांततेचा तह केला ?
 अ .इंदोर.

ब  रायघाट.

क नागपूर

ड लासवारी
उत्तर
ब  रायघाट

3. खालीलपैकी कोणती बाब वेलस्लीच्या विस्तारवादी धोरणात येत नाही ?
 अ .तैनाती फौज.

सरळ सरळ युद्ध.

दत्तक वारसा नामंजूर

ड मांडलिक राजांचा प्रदेश ताब्यात घेणे
उत्तर
दत्तक वारसा नामंजूर

4. हिर रांझा हे पंजाबी काव्य कोणी रचले  ?
 अ मिर्झा गालिब..

ब .दयाराम

क वरीस शहा

ड शहा अब्दुल लतीफ
उत्तर
क वरीस शहा

5. कोणत्या मध्ययुगीन राजाने वेधशाळा बांधल्या  ?
 अ .अकबर.

ब .सवाई जयसिंग

टिपू सुलतान

नानासाहेब पेशवे
उत्तर
ब .सवाई जयसिंग

6. कोणत्या भारतीय राजाने जेकोबीन क्लब चे सदस्यत्व पत्करले  ?
 अ दुसरा बाजीराव पेशवे ..

ब .टिपू सुलतान

मुर्शिद कुली खान

महंमद शहा
उत्तर
ब .टिपू सुलतान

7. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा आणि शहाजहान चे मयुर सिंहासन कोणी आपल्या लुटीत बरोबर नेले  ?
 अ .इराणचा नादीरशहा.

ब .गझनीचा महंमद

तैमुर

अहमदशहा अब्दाली
उत्तर
अ .इराणचा नादीरशहा

8. मुर्शिद कुली खान याच्या काळात बंगालमध्ये कोणत्या जमीनदारांनी उठाव केला  ?
 अ .सीताराम राय.

ब .शुजात खान

नाजात खान

वरील सर्व
उत्तर
वरील सर्व

9. महाराजा नवाब राय कोणाच्या सरकारमधील सर्वोच्च व्यक्ती होते  ?
 अ .अयोध्येचा नवाब सफदर जंग.

ब .बंगालचा नवाब मुर्शिद कुली खान

हैदराबादचा निजाम उल मुल्क असफ जाह

मुघल बादशहा महमद्शहा
उत्तर
 अ .अयोध्येचा नवाब सफदर जंग

10.  १६११ मध्ये इंग्रजांनी आपली पहिली वखार -------------येथे स्थापन केली ?
 अ .मद्रास.

ब .मच्छली पट्टणम

पुदुच्चेरी

मुंबई
उत्तर
ब .मच्छली पट्टणम