> MPSC/UPSC: 2017

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

भूगोल प्रश्नसंच ७






१.  कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?     
अ .सहा

ब .सात

क. आठ

ड. दहा

उत्तर
क.आठ 

२.भारताची दक्षिण उत्तर लांबी --------- कि मी आहे 
अ.२९३३

ब.३२३४

क.२९३६

ड.३२१४
उत्तर
ड. ३२१४

३.भारताच्या सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता ?
अ.इंदिरा point

ब .इंदिरा call

क.लेह

ड.सियाचीन
उत्तर
ब. इंदिरा call

४.भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे 
अ. गुजरात

ब.पश्चिम बंगाल

क.केरळ

ड.तामिळनाडू
उत्तर
अ.गुजरात 

५.भारतातील किती राज्यांच्या सीमा प्रदेशाला लागून आहे 
अ. १२

ब.१७

क.१९

ड.१६
उत्तर
ब.१७

६.भारताच्या एकून क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने --- % क्षेत्रफळ व्यापले आहे 
अ.९.३७

ब.७.२९

क.९.३६

ड.७.२८
उत्तर
 क.९.३६

७ .सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या कोणत्या राज्य / केंद्राशाशित प्रदेशात आहे ?
अ.गोवा

ब .तेलंगाना

क.मणिपूर

ड.दिल्ली
उत्तर
ड . दिल्ली 

८.खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा 
I. चंडीगड , दादरा नगर हवेली , लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे 
II.मिझोरम, त्रिपुरा या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे
अ .विधान I बरोबर

ब .विधान II बरोबर

क .दोन्हीही चूक

ड .दोन्हीही बरोबर
उत्तर
ड.दोन्हीही बरोबर 


सोमवार, २९ मे, २०१७

राज्यशास्त्र प्रश्न संच ७






१. वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अपराधासाठी खालील शिक्षा आहे ?
      
अ .किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २५००० रु दंड

ब .किमान १ वर्ष ते कमाल ७ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २५००० रु दंड

क.किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान १००० रु. ते २५००० रु दंड

ड .किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २०००० रु दंड

उत्तर
ब. किमान १ वर्ष ते कमाल ७ वर्ष तसेच किमान २००० रु ते २५००० रु दंड 

२. वन संवर्धन कायदा १९८० नुसार अपराधासाठी खालील शिक्षा आहे?

अ. १ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही

ब .१ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड

क .२ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड

ड .२ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही
उत्तर
अ .१ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही 

३.हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९८१ नुसार जर औद्योगिक प्रदूषके हवेत सोडल्यास १८ महिने ते ६ वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आहे. शिक्षा झाल्यानंतरही जर अशी कृती चालू राहिल्या प्रतिदिनी - - -  -- रुपये दंड होतो 
अ. १०००

ब. 2000

क. ५000

ड. ४०००
उत्तर
क.५०००

४.केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना कधी झाली ?

अ. १९५०

ब .१९८०

क.१९९४

ड .१९८५
उत्तर
ड.१९८५

५.खालील विधानांचा विचार करा 
I.पर्यावरण संरक्षण अधिनियम,१९८६ संपूर्ण भारतासाठी लागू आहे.
II.ग्राहक संरक्षण अधिनियम , १९८६ संपूर्ण भारतासाठी लागू आहे 

अ .फक्त विधान I बरोबर

ब .फक्त विधान II बरोबर

क .दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ.फक्त विधान I बरोबर कारण ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ जम्मू आणि काश्मीर या राज्यासाठी लागू नाही 

६.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंबलबजावणी झाली नाही तर एखाद्या व्यक्तीला किती शिक्षा होवू शकते ?
अ .२ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड

ब.३ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड

क.५ वर्षापर्यंत कारावास आणि /व २० कोटी रुपये दंड

ड .२ वर्षापर्यंत कारावास आणि /व २० कोटी रुपये दंड
उत्तर
 ब . ३ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड 

७ .राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अध्यक्षाशिवाय  किती सदस्य असतात ?

अ १५

ब .किमान १० व कमाल २०

क.किमान १० व कमाल १५

ड.किमान १५ व कमाल २०
उत्तर
ब. किमान १० व कमाल २०

८.केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची वर्षातून कमीत कमी किती बैठका होणे आवश्यक आहे ?

अ .एक

ब .दोन

क.तीन

ड .चार
उत्तर
अ .एक 


सोमवार, २२ मे, २०१७

पृथ्वीचे अंतरंग

प्रस्तावना
       
             पृथ्वीचे अंतरंग हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या भागावर सर्व प्रकारच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
            भूपृष्टापासून पृथ्वीच्या केंद्राचे अंतर ६३७१ कि.मी. आहे



                          पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :

शिलावरण 
 
 @ यालाच भूकवच असे म्हणतात
@ जाडी ४२ कि.मी.
@ २९ % जमीन व ७१ % पाणी




@ शीलावरणाचे दोन थर आहेत
१.वरण
२.भात 

१.सियाल
२.सायमा.
                  भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.



सियाल सायमा
जाडी (कि मी मध्ये ) २९ १३
घनता (ग्राम /घन सेमी ) २.६५ ते २.७७ २.८५ ते ३.३
'p' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ५.६ ६ ते ७.२
's' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) ३.२ ३ ते 4

प्रावरण /मध्यावरण 
             
             पृथ्वीच्या एकूण  घनफळ पैकी ८३ % घनफळ व वस्तुमानापैकी ६८ % वस्तुमान प्रावरणाने व्यापले आहे. या थराची जाडी २८६५ कि मी आहे

           प्रावरणाचे दोन भाग आहेत
१. बाह्य प्रावरण
२.आंत प्रावरण


#बाह्य प्रावरण
    -जाडी : भूपृष्ठापासून ४२ कि मी ते ७०० कि मी दरम्यान
    -या आवरणाला मंद्गामी तरंगाचे शंकू म्हणतात
    -शिलारसच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित
    - पृथ्वीवर समस्थायी  उपयोजन घडवून येण्यास कारणीभूत


#आंत प्रावरण
  -जाडी : भूपृष्ठापासून ७००कि मी ते २८९० कि मी दरम्यान
 - सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड सापडतात

गाभा 
 

 -भूपृष्ठापासून अंतरंगात २८९० किमी पासून ते ६३७१ कि मी पर्यंत पृथ्वीचा गाभा आहे
-गाभ्यात निकेल आणि लोह असते
-निकेल व  लोह यांचे प्रमाण ८०:२०आहे
-पृथ्वीच्या एकून घनफळ पैकी १६ % घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२ % वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे
-गाभ्याची सरासरी घनता प्रावरणा च्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे.
-पृथ्वीच्या केंद्रावर तापमान २००० अंश सेल्सिअस असते तर दाब ३५ लाख वातावरणाच्या दाबा इतका असतो
-पृथ्वीच्या अंतर्भागात दर१०० मीटर खोलीवर तापमान ३ अंश सेल्सिअस ने वाढते


गाभ्याचे दोन भाग आहेत
१.बाह्य गाभा
२.आंतरिक गाभा


#बाह्य गाभा
@ अंतरंगात २८९० कि मी  ते ५१५०कि मी  पर्यंत
@ द्रवरूप
@ 's' भूकंप लहरी जावू शकत नाही
@घनता : १० ग्राम /घन से मी


#आंतरिक गाभा
@अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ कि मी पर्यंत
@घन अवस्थेत
@घनता : १३.३ ते १३.६ ग्राम /घन से मी







विलगता



विलगता ज्या दोन थरांच्या दरम्यान आहेत ते थर इतर
कॉनरॉड विलगता सियाल व सायमा
मोहो विलगता भूकवच व प्रावरण 'p'भूकंप लहरींची गती एकदम कमी होते
गटेमबर्ग विलगता प्रावरण व गाभा
संक्रमण विभाग बाह्य गाभा व आंतरिक गाभा जाडी ४५० कि मी





सरावासाठी प्रश्न 


१.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
अ.सियाल
ब.निफे
क.सायमा
ड.शिलावरण


२.पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान --------  हि विलगता आढळते
अ.मोहो
ब.गटेनबर्ग
क.भू भौतिक
ड.संक्रमण विभाग