> MPSC/UPSC: 2014

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

बुद्धिमत्ता चाचणी २


खालील प्रश्न क्रमांक १ ते ४ करिता प्रथम काही विधाने दिलेली आहेत त्यावरून काही निष्कर्ष काढलेले आहेत.  त्यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा
१. विधाने : सगळ्या जीप कार आहे .  सगळ्या कर बसेस आहेत.  काही बस ट्रक आहेत.
    निष्कर्ष : I. काही जीप ट्रक आहेत. II सगळ्या जीप बसेस आहेत.
 

अ. फक्त निष्कर्ष I बरोबर

ब .फक्त निष्कर्ष II बरोबर

क. दोन्हीही निष्कर्ष बरोबर

ड. दोन्हीही निष्कर्ष चूक

उत्तर
क दोन्हीही निष्कर्ष बरोबर

२. विधान :काही बॉल शटल आहे. काही शटल फळ्या  आहे. सर्व फळ्या जाळ्या आहे
    निष्कर्ष : I.कोणतीही जाळी बॉल नाही II. सर्व शटल हे जाळी आहे

अ.फक्त निष्कर्ष I बरोबर 

ब.फक्त निष्कर्ष II बरोबर

क.दोन्हीही निष्कर्ष बरोबर

ड. दोन्हीही निष्कर्ष चूक
उत्तर
ड दोन्हीही निष्कर्ष चूक 


ABCDEF हे सात मित्र  उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत उभे आहेत. त्यांच्यातील  क्रम विस्कळीत आहे E हा G च्या डावीकडून तिसरा आहे.  E आणि कोणत्याही टोकाला नाही A हा D च्या उजवीकडून तिसरा आहे.  C हा F च्या डावीकडून चौथा आहे.  C हा कोणत्याही टोकाला नाही . सदरील माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या

३.  A च्या उजवीकडून दुसरा कोण ?

अ. B

ब. C

क. D

ड. G

उत्तर
ड G 

४. G च्या डावीकडून पाचवा कोण ?


 अ. D

ब. B

क. C

ड. A
उत्तर
अ D

५. F च्या उजवीकडून दुसरा कोण ?


अ.A

ब.B

क.C

ड. यापैकी नाही  

उत्तर
ड यापैकी नाही  

६.सर्वात मध्यभागी कोण आहे ?

अ. B

ब. A

क. C

ड. D
उत्तर
 ब A

७. सर्वात टोकाला कोण आहे ?

अ.A आणि B

ब. D आणि B

क. D आणि F

ड .A आणि F
उत्तर
क D आणि F 

८. एका तुरुंगातून एक चोर ताशी २० किलोमीटर वेगाने पळाला . पोलिसांनी  २ तासानंतर ३० किलोमीटर वेगाने पाठलाग केला   तर किती तासाने पोलीस चोराला पकडतील ?


 अ. २

ब.४

क.६

ड. अपूर्ण माहिती
उत्तर

ब ४  येथे अपूर्ण माहिती हे देखील उत्तर असू शकते कारण जर पोलीस चोराच्या दिशेने न जाता दुसऱ्याच दिशेने गेल्यास चोर सापडण्याची शक्यताच नाही पण जर चोर पोलिसाच्या दिशेने  पळाले तर ४ तासात चोर सापडेल
 
 

९. राजेशला ३०० KM अंतर पार करायचे होते त्याने प्रत्येकी १०० KM या तीन टप्प्यात अनुक्रमे ३० , ६० , ८० किलोमीटर प्रति तास या वेगात ते अंतर पार केले तर त्याचा सरासरी वेग किती होता ?


अ.५२ किलोमीटर प्रति तास

ब.४८ किलोमीटर प्रति तास

क.५० किलोमीटर प्रति तास

ड. ५४ किलोमीटर प्रति तास
उत्तर
ब ४८ किलोमीटर प्रति तास  

 १०. खालील शृंखलेत येणारे पुढील अक्षर ओळखा
ABCDEFGHABCDEFABCDEF

अ.A
ब.H

क.G

ड.E
उत्तर
अ A 
 




 

रविवार, १० ऑगस्ट, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच ५



१. भारतीय राज्य घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश भाग चार मधील कलम ३६ ते ५१ मध्ये करण्यात आला आहे. त्यातील कलम ३६ कशाशी संबंधित आहे ?
 

अ. पर्यावरण

ब . राज्याची संकल्पना

क. प्राथमिक शिक्षण

ड. ग्रामपंचायत

उत्तर
ब. राज्याची संकल्पना

२.खालील कोणत्या घटनादुरुस्तीने मार्गदर्शक तत्व या भागात बदल केले नाही ? 

अ. ४२ व्या

ब. ४४ व्या

क. ८६ व्या

ड. ९२ व्या
उत्तर
ड ९२ व्या

३. खालील कोणती घटनादुरुस्ती अशी आहे जिच्यामुळे  मुलभूत अधिकार किंवा  मार्गदर्शक तत्त्व यापैकी फक्त एकातच दुरुस्ती झालेली आहे?

अ.४२ वी

ब. ४४ वी

क. ८६ वी

ड. यापैकी नाही

उत्तर
ड यापैकी नाही  

४.खालील विधानांचा विचार करा
I मुलभूत अधिकारांचा उद्देश्य लोकशाही राजकीय  व्यवस्था निर्माण करणे हा आहे
II मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश्य सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणे हा आहे. 

अ.विधान I बरोबर

ब.विधान II बरोबर

क.विधान I व II बरोबर

ड.विधान I व II दोन्हीही चूक
उत्तर
क विधान I व II बरोबर

५. १९८७ मधील विधिक सेवा प्राधिकरण अधिनियमानुसार गरीब व्यक्तींना मोफत न्यायिक सहाय्यता मिळते सदर अधिनियम घटनेतील कोणत्या कलमानुसार निर्मिला गेला?

अ.४०

ब.४५

क.५०

ड.३९ क
उत्तर
ड ३९ क सदर कलम ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले आहे

६.भारतीय घटनेतील भाग ४ सोडून असे कोणते कलम आहे जे राज्याला मार्गदर्शन करते?

अ.कलम ३२५

ब.कलम ३५० क

क. कलम ३५१

ड. वरील सर्व
उत्तर
 ड वरील सर्व ,
कलम ३२५ राज्याला अनुसूचित जाती आणि जमाती करिता नोकर भरती बाबत मार्गदर्शन करते
कलम ३५० क राज्याला भाषिक अल्पसंख्याक वर्गातील जनतेक रिता प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याकरिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता मार्गदर्शन करते
कलम ३५१ राज्याल हिंदी भाषा विकासाकरिता व्यवस्था करण्याकरिता मार्गदर्शन करते

७.भारतीय राज्यघटनेतील असा कोणता भाग आहे जो एका समाजवादी राज्यघटनेतून घेतला आहे

अ.मुलभूत अधिकार

ब.मार्गदर्शक तत्त्व

क.मुल कर्तव्य

ड.नागरिकत
उत्तर
क मुल कर्तव्य , जे रशियन राज्यघटने तून घेतले आहे  

८. भारतीय राज्य घटनेत किती कलमांत मुल कर्तव्यांचा उल्लेख आहे

 अ.एक

ब. अकरा

क.दहा

ड. सात
उत्तर
अ एक , कलम ५१ क   

९.स्वर्णसिंग समितीने -------- मुलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस केली होती पण ४२ व्या घटनादुरुस्तीने ------- मुलभूत कर्तव्य जोडण्यात आले

अ.८ ,१०

ब.१० , ८

क.८,८

ड.१०, १०
उत्तर
अ ८ ,१०

 १०.खालील विधानांचा विचार करा
I सर्व मुलभूत अधिकार भारतीय आणि विदेशी नागरिकांकरिता आहे
II मुल कर्तव्य हे फक्त भारतीयांकरिता आहेत ते विदेशी नागरिकांना नाही

अ.फक्त I बरोबर
ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड.दोन्हीही चूक
उत्तर
ब फक्त II बरोबर , काहीच मुलभूत अधिकार विदेशी नागरिकांना लागू होतात सर्व नाही  
 




 

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

भूगोल प्रश्नसंच ५




१. भारताचे स्थान -------- व ---------- गोलार्धात आहे
 

अ .उत्तर व पश्चिम

ब .उत्तर व पूर्व

क .दक्षिण व पूर्व

ड .दक्षिण व पश्चिम

उत्तर
ब उत्तर व पूर्व

२. कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ. ६०

ब. ३०

क.४५

ड. १५
उत्तर
क ४५ 

३.लेह येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ.१२०

ब.२४०

क.३६०

ड.१८०

उत्तर
ब २४० 

४.अरुणाचल प्प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला गुजरात मधील घुअर मोटा येथील सुर्योदायातील वेळेचा फरक सुमारे ------- मिनिटाचा आहे.

 अ.११६

ब.१२६

क.१३६

ड.१४६
उत्तर
अ ११६

५. -------- महासागर हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले गेले आहे

अ.अटलांटिक

ब. आर्टिक

क.हिंदी

ड.प्रशांत
उत्तर
क हिंदी  

६.जम्मू आणि काश्मीर या राज्याची सीमा किती देशांशी जोडली आहे

अ.२

ब.3

क.४

ड.१
उत्तर
 क ४ 

७.असे देश किती आहेत ज्यांची सीमा भारतातील चार राज्यांशी जोडलेली आहे

अ.३

ब.४

क.२

ड.१
उत्तर
अ३

८. बिहार राज्याला कोणत्या देशाची सीमा जोडली आहे

 अ.नेपाल

ब. भूतान

क.चीन

ड. अ आणि ब दोन्हीही
उत्तर
अ नेपाल  

९.हिमालय पर्वत रागांचा गाभा ---- खडकांनी बनलेला आहे

अ.कणाश्म

ब. अग्निज

क.स्थरित

ड.रूपांतरित
उत्तर
अ कणा श्म

 १०.

अ.
ब.

क.

ड.
उत्तर
ब पारस-परळी -एकलहरे -कोरडी 
 




 

सोमवार, १४ जुलै, २०१४

बुद्धिमत्ता चाचणी १



१जर ४:२० तर ६ : ?. 
 

अ.३५

ब.३६

क.४२

ड .४८
उत्तर
क ४२

२. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा २१,३१,४२,६२,८४,?

अ. १०८

ब.११०

क.१२०

ड.१२४
उत्तर
ड १२४ 

३. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा १६९,१२१,८१,४९,?

अ.३१

ब.२९

क.२५

ड.२३
उत्तर
क २५ 

४.इंग्रजी वर्णमालेत F आणि V पासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते ?

 अ.M

ब.N

क.L

ड.O
उत्तर
N

५.९५ सालचा स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच सालचा शिक्षकदिन कोणत्या वारी असेल?

अ.मंगळवार

ब.बुधवार

क.गुरुवार

ड.सोमवार
उत्तर
अ. मंगळवार  

६.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा २,१०,४०,१२०,२४०,?

अ.३६०

ब.४२०

क.४८०

ड.२४०
उत्तर
 ड २४० 

७.गटात न बसणारी संख्या ओळखा

अ.९१

ब.७९

क.३९

ड.६५
उत्तर
ब ७९ 

८. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा १,२,९,२८,६५,?

 अ.५५

ब.६५

क.१२

ड.यापैकी नाही
उत्तर
ब ६५  

९. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा २,३,५,७,८,?,११,१५

अ.१२

ब.१३

क.११

ड.१०
उत्तर
ड १० 

 १०. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा ३७,३१,२९,२३,१९,१७,?

अ.११
ब.१५

क.१३

ड.यापैकी नाही
उत्तर
अ ११  
 




 

मंगळवार, २२ एप्रिल, २०१४

इतिहास प्रश्न संच ८


१. इ. स. १५३९ मध्ये प्रसिद्ध चौसाची लढाई कोणात झाली

अ. बाबर आणि इब्राहीम लोदी

ब. हुमायून आणि शेर शाह

क. हुमायून आणि राणा संघ

ड. बहादुरशहा आणि हुमायून

उत्तर
ब. हुमायून आणि शेर शाह

२. बाबरच्या मृत्युनंतर वयाच्या --------- व्या वर्षी हुमायून गादीवर आला  

 अ.२२

ब . २५

क. २३

ड. २०
उत्तर
क २३

३.खालील विधानांचा विचार करा
I अकबरनामा हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला
II तबकात इ अकबरी हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला

 अ.फक्त I  बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ. फक्त I बरोबर , तबकात इ अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद ने लिहिला 


४. ज्या व्यक्तींनी आपली  , आपल्या वडिलांची  आणि आपल्या आजोबांची  कारकीर्द अनुभवली असेल त्यांनी आपल्या आठवणी लिहीव्यात असा आदेश कोणत्या बादशाहने दिला ?

 अ. शाहजहान

ब. औरंगजेब

क. अकबर

ड. जहांगीर
उत्तर
क. अकबर

 
५. सामान्य प्रजाजनांचा मुघल राजवटीला पाठींबा मिळावा म्हणून न्यायाच्या नगार्याची[ तबल इ अदल ] ची व्यवस्था कोणी केली ? 

 अ.बाबर

ब. अकबर

क. हुमायून

ड. औरंगजेब
उत्तर
क हुमायून

६. ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावरून पडून कोणत्या मुघल सम्राटाचा मृत्यू झाला

 अ.बाबर

ब.अकबर

क. हुमायून

ड.शहाजहान
उत्तर


७.शेर शाह सूर बाबत खालील विधानांचा विचार करा
I. त्याचे पूर्वीचे नाव फरीद होते
II. त्याने वाघाची शिकार केल्याने त्याला शेर शाह हा किताब देण्यात आला
III. त्याचा मृत्यू १४८९ मध्ये झाला. 

 अ. विधान I आणि II बरोबर

ब. विधान II आणि III बरोबर

क. विधान I आणि III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर

८.  शेर शाह चा मृत्यू कशामुळे झाला ?

 अ. तोफ गोळ्यांच्या सपोटात भाजला जावून

ब. युद्धात तो मारला गेला

क. वृद्धापकाळात तो मृत्युमुखी पडला

ड. यापैकी नाही
उत्तर
अ तोफ गोळ्यांच्या स्पोटात भाजला जावून
 
९. विधान A: शेर शहाने लाहोर पासून मुलतान पर्यंत रस्ता बांधला
    कारण  R: मध्य आणि पश्चिम आशियाकडे रवाना होणार्या व्यापारी काफिल्यांचे मुलतान हे प्रमुख केंद्र होते

 अ. विधान A बरोबर पण कारण R चूक

ब . विधान A चूक  पण कारण R बरोबर

क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण आहे

ड.दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण नाही
उत्तर
क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य  स्पष्टीकरण आहे

१०. खालील विधानांचा विचार करा
I शेर शहानेमहामार्गांवर दर दोन कोस अंतरावर सराया बांधल्या होत्या
II या सरायांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे विभाग नव्हते तेथे त्यांना एकत्रच भोजन करावे लागे

 अ.फक्त I बरोबर

ब .फक्त II बरोबर

 क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर








 

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच ४









१.संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवल एकच सर्वसाधारण मतदार यादी असते हे कलम ------ मध्ये सांगितले आहे

अ. ३२४

ब. ३२५

क.  ३२६

ड. ३२७

उत्तर
ब ३२५

२. खालील विधानांचा विचार करा
I. परिसीमन आयोगाबाबत घटनेच्या कलम ३२९ मध्ये तरतुदी आहेत
II. परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम नसून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते

 अ. फक्त I बरोबर

ब . फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर, परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम असतात

३.------------ सालापासून निवडणूक याचिकांची केवळ उच्च न्यायालयात सुनावणी केली जाते. 

 अ. १९६६

ब. १९८९.

क. १९९३

ड. १९५०
उत्तर
अ १९६६  


४. खालील विधानांचा विचार करा
I. कलम ३२९ ब नुसार समर्पक कायदेमंडळ निवडणुकीचे वाद संपुष्टात आणण्याकरिता न्यायाधिकरणाची स्थापना करू शकते
II. एल. चंद्रकुमार वि. भारत सरकार या खटल्यात हि तरतूद घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले

 अ. फक्त I बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड दोन्हीही चूक
उत्तर
क दोन्हीही बरोबर 

 
५. उच्च न्यायालय जेव्हा संबंधित उमेदवाराची निवडणूक नाकारते तेव्हा त्याला -------- वर्षाकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र केले जाते.

 अ. ४

ब. ६

क. ८

ड. १०
उत्तर
ब ६ 

६.एस. एल. शकधर यांनी निवणूक सुधारनासंदर्भात कोणत्या  शिफारसी केल्या होत्या ?
I लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घ्याव्यात
II आरक्षित जागांमध्ये चक्राकार पद्धतीने बदल करणे
III. दुर्बल घटकांसाठी फिरते मतदान केंद्र उभारावे  

 अ. I व II बरोबर

ब. I व III बरोबर

क I I व III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर
अ. Iव II बरोबर 

७. विद्युत मतदान यंत्र वापरण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती
 अ. मधु दंडवते

ब. दिनेश गोस्वामी

क. आर. के. त्रिपाठी

ड.एस. एल . शकधर
उत्तर
ब दिनेश गोस्वामी

८. निवडणुकांसाठी लागणारी शाई कोणती संस्था पुरविते?

 अ कर्नाटका पेंट्स लिमिटेड

ब .त्रावणकोर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

क. म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

ड. यापैकी नाही
उत्तर
क म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

९. चवथ्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष ------- हे होत

 अ. कुलदीप सिंघ

ब . अम्रर  सिंघ

क न्या. भरुचा

ड. बी बी टंडन
उत्तर
अ कुलदीप सिंघ 

१०.भारतात विद्युत मतदान यंत्राचा वापर सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला ?

 अ. तामिळनाडू

ब .गुजरात

 क. केरळ

ड. कर्नाटक
उत्तर
क केरळ
 





 

सोमवार, २४ मार्च, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच 3






१.खालील विधानांचा विचार करा
A.संविधान सभेने विधानपरिषदेची स्थापना करण्यास नाराजी दर्शविली
R. विधान परिषदेमुळे विधान मंडळाच्या कार्याला उशीर होईल आणि खर्चात वाढ होईल

अ विधान A बरोबर आणि R चूक.

ब विधान A हे चूक आणि R बरोबर

क दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे

ड दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही

उत्तर
क दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे  

२.खालील विधानांचा विचार करा
  I १९५७ मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद स्थापन करण्यात आली
  II १९८५ मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद समाप्त करण्यात आली
III १९८६ मध्ये तामिळनाडू विधान परिषद समाप्त करण्यात आली
IV १९६९ मध्ये पंजाब विधान परिषद समाप्त करण्यात आली
V १९७१ मध्ये पश्चिम बंगाल विधान परिषद समाप्त करण्यात आली

अ.विधान I , II, III बरोबर

ब. विधान I , II, III, IV बरोबर

क विधान II, III, IV बरोबर

ड सर्व विधाने बरोबर
उत्तर
ब. विधान I , II, III, IV बरोबर

३.विधानसभेतील आमदारांच्या संख्येबाबत खालील विधानांचा विचार करा
I. हि संख्या ६० ते ५०० या दरम्यान असते
II. अरुणाचल प्रदेश , सिक्कीम , व गोवा या राज्यांसाठी ती ३० आहे
III.मिझोरम करिता ती ४० तर नागालँड करिता ४६ आहे
IV.सिक्कीम आणि नागालँड विधानसभेकारिता काही सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे घेतात
अ. विधान I , II ,III बरोबर

ब .विधान I,II,IV बरोबर

क. विधान II, III, IV बरोबर

ड वरील सर्व विधाने बरोबर
उत्तर
 ड वरील सर्व विधाने बरोबर

४.संविधानाच्या पाचव्या भागात कलम ------- ते ------ मध्ये संघ कार्य्पालीकेचे वर्णन केले आहे
अ. ५४,८०

ब ५२,७८

क ५६,६४

ड ५८,७६
उत्तर
ब ५२,७८

५. संघ कार्य पालिकेत खालील घटक असतात
I राष्ट्रपती
 II उपराष्ट्रपती
III प्रधानमंत्री
IV मंत्रिमंडळ
V महान्याय् वादी
अ.I ,II ,III,IV

ब. I ,III, IV ,V

क I ,III, IV

ड वरील सर्व
उत्तर
ड. वरील सर्व

६.७० वी घटनादुरुस्तीनुसार खालील कोणत्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेवू शकतात ?
अ. दिल्ली

ब. पुदुच्चेरी

क. वरील दोन्ही

ड. कोणतीही नाही
उत्तर
क वरील दोन्ही

७. खालील विधानांचा विचार करा
I राष्ट्रपती निवडणुकीसाठी रु. १५०००/- रक्कम अनामत म्हणून SBI मध्ये जमा करावी लागते
II जर एकून मतांच्या १/६ मते न मिळाल्यास अनामत रक्कम जप्त होते
अ.विधान I बरोबर आणि II चूक

ब.विधान II बरोबर आणि I चूक

क दोन्हीही विधाने बरोबर

ड दोन्हीही विधाने चूक
उत्तर
ब.विधान II बरोबर आणि I चूक

८ राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात
अ.पंतप्रधान

ब सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे

क. राज्यसभेच्या सभापतीकडे

ड लोकसभेच्या अध्यक्षांकडे
उत्तर
क. राज्यसभेच्या सभापतीकडे

९.कोणत्या राष्ट्रपतींनी दोनवेळा राष्ट्रपती पद धारण केले ?
अ. राजेन्द्रप्रसाद

ब. सर्वपल्ली राधाकृष्णन

क. नीलम संजीव रेड्डी

ड. व्ही. व्ही. गिरी
उत्तर
 अ. राजेन्द्रप्रसाद .

१०. आपल्या कार्यकाला दरम्यान कोणत्या राष्ट्रपतींचे निधन झाले?
अ.डॉ जाकीर हुसेन आणि व्ही व्ही गिरी

ब .डॉ जाकीर हुसेन आणि नीलम संजीव रेड्डी

क डॉ जाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद

ड सर्वपल्ली राधाकृष्णन आणि फक्रुद्दीन अली अहमद
उत्तर
क डॉ जाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद





 

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच २



१ खालील विधानांचा विचार करा
क.  संविधानातील कलम ३४३ ते ३५१ राज भाषेशी संबंधित आहे
 ख.  संविधानानुसार ज्या संख्या वापरात येतात , त्या आंतरराष्ट्रीय असाव्यात, देवनागरी नको  
 

अ फक्त क बरोबर

ब .फक्त ख बरोबर

क .दोन्हीही बरोबर

ड .दोन्हीही चूक

उत्तर
क दोन्हीही बरोबर

२ खालील विधानांचा विचार करा
क.  भारतीय संविधानानुसार संविधान लागू झाल्यानंतर राजभाषेसंदर्भात प्रथम पाच वर्षानंतर आणि तद्नंतर ५ वर्षानंतर राष्ट्रपती एका आयोगाची नेमणूक करेल
ख.  १९५५ नंतर बी जी खेर यांच्या अध्यक्षतेखाली असा आयोग नेमण्यात आला होता आणि त्यांनंतर १९६५ साली न्या. फजल आली यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आयोग नेमण्यात आला

अ फक्त क बरोबर

ब फक्त ख बरोबर

क दोन्हीही बरोबर

ड दोन्हीही चूक
उत्तर
 अ फक्त क बरोबर 

३ सर्वोच्च न्यायालयात कोणत्या भाषेतील याचिकेवर सुनावणी होते ? ?

अ इंग्रजी

ब हिंदी

क दोन्हीही

ड आठव्या अनुसूचीतील २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेत

उत्तर
 अ इंग्रजी

४ सध्या आठव्या अनुसूचित २२ भाषांचा समावेश करण्यात आला आहे , मूळ संविधानात ----------- भाषा आहे ?

अ १२

ब १४

क १६

ड १८
उत्तर
ब १४

५ अखिल भारतीय सेवेचे जनक कोणाला म्हणतात ? 

 अ पंडित नेहरू

ब  सर्वपल्ली राधाकृष्णन

क सरदार वल्लभभाई पटेल

ड लाल बहाद्दूर शास्त्री
उत्तर
क सरदार वल्लभभाई पटेल

६. भारतीय संसदेने कलम ------- चे पालन करून प्रशासकीय अधिकरण अधिनियम, १९८५ संमत केला

 अ ३२३ क

ब  २३२ ग

क ३२३ ग

ड २३२ क
उत्तर
 अ ३२३ क

७. केंद्रीय प्रशासनिक अधिकरण  CAT चे १७ खंडपीठे आहेत त्यापैकी १५ हे मुख्य न्यायालयाच्या प्रधान पीठात आहे इतर दोन कोणत्या ठिकाणी आहे ?

 अ जयपूर आणि वाराणसी

ब . जयपूर आणि  बिकानेर 

क जयपूर आणि लखनऊ

ड  कन्याकुमारी आणि जम्मू
उत्तर
क जयपूर आणि लखनऊ

८ CAT च्या कार्यक्षेत्रात कोणते कर्मचारी येतात ?

 अ सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी

ब . संसदेच्या सचिवालयातील कर्मचारी

क  सैन्य सेवांमधील अधिकारी

ड  वरील सर्व
उत्तर
ड वरील सर्व

९.CAT मध्ये तक्रारदाराला किती रुपये शुल्क भरावे लागते ?

 अ ५०/-

ब. ५०००/-

क १००००/-

ड  १०००/-
उत्तर
अ ५०/-

 १०. खालील विधानांचा विचार करा
I विधान परिषदेचे विघटन संसद करू शकते
II संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा प्रस्ताव पूर्ण बहुमताने मंजूर करावा
III अशा प्रकारचा ठराव हा कलम ३६८ नुसार घटनादुरुस्ती ठरते
 
 अ फक्त Iआणि II बरोबर

ब. फक्त IIIआणि II बरोबर

क फक्त Iआणि III बरोबर

ड  सर्व विधाने बरोबर
उत्तर
अ फक्त I आणि II बरोबर
 




 

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

भूगोल प्रश्नसंच ४.


१.महाराष्ट्रातील ----------% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते 
 

अ .१५. ३३

ब .१२. ३३

क .१९. ३५

ड .२१. ३५

उत्तर
ब १२. ३३

२. महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजसंपत्ती कोणत्या जिल्ह्यात आहे?

 अ नागपूर

ब .कोल्हापूर

क चंद्रपूर

ड गोंदिया
उत्तर
क चंद्रपूर 

३.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मॅग्निज  आढळत नाही ?

 अ .भंडारा

ब . नागपूर

क सिन्दुदुर्ग

ड बुलढाणा

उत्तर
ड बुलढाणा 

४. सिलो मिलोन हे खनिज कोणत्या धातुशी संबंधित आहे ?

 अ मॅग्निज

ब .सोने

क गंधक

ड लोह
उत्तर
मॅग्निज

५. कोळशाचे कार्बानीकरण करून कोणता पदार्थ मिळविता येवू शकतो ?

 अ अमोनिअम सल्फेट

ब  फेरस सल्फेट

क मॅग्नेशियम सल्फेट

ड कॅल्शियम सल्फेट
उत्तर
अ अमोनिअम सल्फेट 

६. तारापूर अणु विद्युत केंद्र कोणत्या राष्ट्राच्या सहकार्याने चालू आहे ?

 अ फ्रान्स

ब .अमेरिका

क  रशिया

ड जापान
उत्तर
 ब अमेरिका 

७. पवनचक्की चालविण्यासाठी वार्याचा कमीत कमी वेळ किती असावा ?

 अ १ मी /से

ब .२ मी /से

क ३ मी /से

ड ४ मी /से
उत्तर
क ३ मी /से 

८ महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणता जिल्हा गौरविला गेला आहे ?

 अ .कोल्हापूर

ब . पुणे

क रायगड

ड सिंधू दुर्ग
उत्तर
ड सिंधू दुर्ग  

९.कोणत्या किरणांना मृत्यू किरण म्हणतात 

 अ क्ष -किरण

ब. लेसर किरण

क अल्फा किरण

ड  यापैकी नाही
उत्तर
ब लेसर किरण 

 ९ महाराष्ट्रातील विद्युत क्षमतेचा विचार करून औष्णिक विद्युत केंद्रांचा चढता क्रम लावा
 
 अ पारस - कोरडी - परळी - एकलहरे

ब. पारस - परळी -एकलहरे -कोरडी

क पारस -एकलहरे -परळी - कोरडी

ड  एकलहरे -पारस -कोरडी -परळी
उत्तर
ब पारस-परळी -एकलहरे -कोरडी 
 




 

बुधवार, १ जानेवारी, २०१४

इतिहास प्रश्नसंच ७







१. १९७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले. पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते
 

अ .विल्यम बेन्तिक

ब .वॉरन हेस्टीग्ज

क .रोबर्ट क्लाइव्ह

ड .लॉर्ड कोर्नवालीस

उत्तर
ब वॉरन हेस्टीग्ज 

२. १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले. भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 

 अ विल्यम बेन्तिक

ब .वॉरन हेस्टीग्ज

क रोबर्ट क्लाइव्ह

ड लॉर्ड कोर्नवालीस
उत्तर
अ विल्यम बेन्तिक 

३.---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले. 

 अ .१८५८

ब . १८११

क १८६१

ड १८३३

उत्तर
ड १८३३

४. १८५८ च्या भारत शासन अधिनियमानुसार भारताचे सर्वप्रथम व्हाईस रॉय कोण होते ?

 अ लॉर्ड कनिंग .

ब .वॉरन हेस्टीग्ज

क रोबर्ट क्लाइव्ह

ड लॉर्ड कोर्नवालीस
उत्तर
अ लॉर्ड कनिंग 

५. १९०९ च्या कायद्याने सर्वप्रथम एका भारतीय व्यक्तीला व्हाईस रॉय च्या कायदेमंडळात सदस्य म्हणून निवडण्यात आले ती भारतीय व्यक्ती कोण ?

 अ महादेव गोविंद रानडे

ब  सत्येंद्र प्रसाद सिन्हा

क लाल लजपतराय

ड पंडित मदन मोहन मालदीव
उत्तर
ब सत्येंद्र प्रसाद सिन्हा 

६. सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

 अ लॉर्ड कर्झन

ब .लॉर्ड मिन्टो

क मोंटेग्यु

ड  चेम्सफर्ड
उत्तर
 ब लॉर्ड मिन्टो 

७ १९३५ च्या कायद्याने --------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला 

 अ ५

ब .१०

क १५

ड २०
उत्तर
ब .१०

८ भारतीय संविधान सभेतील प्रांतीय संविधान सभेचे अध्यक्ष --------- हे होते ?

 अ .पंडित नेहरू

ब . बाबासाहेब आंबेडकर

क सरदार वल्लभभाई पटेल

ड राजेन्द्रप्रसाद
उत्तर
क सरदार वल्लभभाई पटेल 

९. भारतीय संविधानातील आणि बाणी विषयक तरतुदी कोणत्या संविधानावरून घेतले आहे?

 अ इंग्लंड

ब रशिया

क जर्मनी

ड फ्रान्स
उत्तर
क जर्मनी 

१०.भारताच्या संविधान सभेत  कोणत्या  महिलांचा   समावेश  होता ?

 अ अम्मू स्वामिनाथन आणि दुर्गाबाई देशमुख

ब हंसा मेहता आणि विजया लक्ष्मि पंडित

क सरोजनी नायडू

ड वरील सर्व
उत्तर
ड वरील सर्व