> MPSC/UPSC: राज्यशास्त्र प्रश्न संच १

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

राज्यशास्त्र प्रश्न संच १








१.घटक राज्यांना जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी या साठी कोणत्या राज्याने राज् मन्नार कमिशन नेमले होते  ?

अ .तामिळनाडू

ब .कर्नाटक

क .पश्चिम बंगाल

ड केरळ

उत्तर
अ तामिळनाडू 

२. राज्यपालांना निवृत्तीनंतर फायद्याचे दुसरे पद देवू नये अशी शिफारस कोणी केली ?

 अ राज मन्नार आयोग

ब. सरकारिया आयोग

क पश्चिम बंगाल सरकारचे निवेदन

ड सेटलवाड समिती
उत्तर
ब सरकारिया आयोग 

३. कलम ----- नुसार न्यायालयाच्या निर्णयावर संसदेत किंवा बाहेर प्रतिकूल भाष्य करता येत नाही 

 अ १२६

ब .१२७

क १२८

ड १२९

उत्तर
ड १२९

 
४. घटनेचा फेरविचार करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी --------------- आयोग स्थापन केला 

 अ.न्या. विश्वेशरय्या

ब .न्या.  व्यंकट चेलय्या

क न्या. पंछी आयोग

ड यापैकी नाही
उत्तर
ब न्या व्यंकट चेलय्या 

५ पश्चिम बंगाल सरकारने केंद्र राज्य संबंधाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्राला १९७७ साली निवेदन सदर केले त्यात खालील कशाचा समावेश नव्हता ?

 अ कलम २४८ नुसार केंद्राला दिलेले शेशाधिकार राज्यांना द्यावेत

ब घटनेच्या उद्देश पत्रिकेत आणि पहिल्या कलमात दुरुस्ती करून 'संघराज्य हा शब्द टाकावा

क कलम २०० आणि २०१ रद्द करावे

ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे

उत्तर
ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे 
 

६.राष्ट्रपती घटनेतील कोणत्या कलमानुसार आंतरराज्यीय परिषद नेमू शकतो ?

 अ.२४२

ब .२६३

क २६८

ड २७२
उत्तर
ब २६३
 
७  कलम -------- नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते  

 अ २८२

ब .२८६

क २८८

ड २९०
उत्तर
अ २८२
 
८ राज्यासुचीतील विषयांवर कायदे करण्याच्या केंद्राच्या अधिकाराबाबत खालील विधानांचा विचार करा 
I . कलम २४९ अन्वये राष्ट्रीय हितासाठी राज्य् सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा ठराव राज्यसभेने २/३ बहुमताने संमत केल्यास संसद त्यावर कायदा करू शकते
II कलम २५१ अन्वये समान विषयावरील संसदेच्या कायद्यास राज्यापेक्षा जास्त महत्त्व आहे

 अ. फक्त विधान I बरोबर

ब.फक्त विधान II बरोबर

क.वरील दोन्हीही विधाने बरोबर

ड.वरील दोन्हीही विधाने  चुकीचे
उत्तर
क वरील दोन्हीही विधाने बरोबर 
 
९.' संपूर्ण देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्र एकात्म ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे ' या विधानाचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा 

 अ.राज्यघटनेत असा कोठेही उल्लेख नाही

ब.कलम ३५५ मध्ये हे विधान आहे

क कलम २०८मध्ये हे विधान आहे

ड.कलम २७० मध्ये हे विधान आहे
उत्तर
ब कलम ३५५ मध्ये हे विधान आहे 

१०.वृत्त पत्र आणि मुद्रणालये हा विषय ---------- सूचित आहे 

 अ केंद्रसुची

ब. राज्य् सूची

क.समवर्ती सूची
 
ड शेषाधिकार
उत्तर
क समवर्ती सूची 




 

४ टिप्पण्या: