> MPSC/UPSC: ब्रिटीश राजवटीतील कायदे

सोमवार, २ मे, २०१६

ब्रिटीश राजवटीतील कायदे • कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटीश संसदेने केलेला पहिला कायदा

 • या कायद्याद्वारे सर्व प्रांतावर म्हणजेच मुंबई , मद्रास व बंगाल या तीन प्रांतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले.  पूर्वी प्रत्येक प्रांतावर स्वतंत्र गव्हर्नर होते 
 • या कायद्याने मध्यवर्ती केंद्र सरकार /सर्वोच्च सरकारची स्थापना करण्यात आली 
 • सल्लागार मंडळ -या कायद्याने गव्हर्नर जनरला प्रशासकीय कार्यात मदत व मार्गदर्शन करण्याकरिता एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले {सदस्य संख्या चार }
 • भारतासाठी कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 
 • या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करण्यास तसेच भारतीय लोकांकडून भेटी स्वीकारण्यास बंदी करण्यात आली 

 • गव्हर्नर जनरलच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटीश संसदेने केलेला कायदा 
 • सहा जणांचे बोर्ड ऑफ कंट्रोल निर्माण करण्यात आले याचे मुख्य कार्य गव्हर्नर जनरल व इस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण ठेवणे
 • १७७३ च्या कायद्यात असणाऱ्या सल्लागार मंडळाची संख्या चार वरून तीन करण्यात आली 
 • १७७३ च्या कायद्यात केलेल्या तरतुदीमुळे १७९३,१९१३,१८३३,१८५३ साली चार्टर अॅक्ट  संमत करण्यात आले 

 • १८१३ च्या चार्टर अॅक्टनुसार -- इस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्ठात आली इतर ब्रिटीश कंपन्यांना आणि व्यक्तींना व्यापार करण्याची परवानगी मिळाली 
 • १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार--- दासप्रथा नष्ट करण्यात आली, लोकसेवेसाठी पात्रता निश्चित करण्यात आली , धर्म, जात , वंश , जन्म यावरून भेदभाव न करण्याचे ठरले 
 • १८५३ च्या चार्टर अॅक्टनुसार----कायदेविषयक व कार्यकारी कार्ये वेगळी करण्यात आली , खुल्या स्पर्धेद्वारे अधिकारी भरतीची पद्धत स्वीकारण्यात आली . 

 • या कायद्याने प्रांतामध्ये उच्च न्यायालये स्थापन करण्यात आले 
 • मद्रास व मुंबई प्रांतात स्वतंत्र कायदेमंडळे स्थापन करण्यात आली 
 • या कायद्याने व्हाईसरॉयला आणीबाणीच्या स्थितीत अध्यादेश काढण्याचा अधिकार मिळाला                                 
    
 • या कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देण्यात आली
 • वृत्तपत्रांवर लादलेले बंधन काढून घेण्यात आले  

 • या कायद्याने केंद्रीय कार्यकारी मंडळाची सदस्यसंख्या वाढविण्यात आली
 • प्रांताला कायदेविषयक अधिकार देण्यात आले 
 • प्रांतीय कायदे मंडळातील निम्मे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडावेत असे ठरले 
 • या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश मिळाला 
 • कायदेकरी सत्ता व कार्यकारी सत्ता  वेगळ्या करण्यात आल्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा