> MPSC/UPSC: राज्यशास्त्र प्रश्न संच 3

सोमवार, २४ मार्च, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच 3


१.खालील विधानांचा विचार करा
A.संविधान सभेने विधानपरिषदेची स्थापना करण्यास नाराजी दर्शविली
R. विधान परिषदेमुळे विधान मंडळाच्या कार्याला उशीर होईल आणि खर्चात वाढ होईल

अ विधान A बरोबर आणि R चूक.

ब विधान A हे चूक आणि R बरोबर

क दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे

ड दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही

उत्तर
क दोन्ही विधाने बरोबर पण विधान R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे  

२.खालील विधानांचा विचार करा
  I १९५७ मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद स्थापन करण्यात आली
  II १९८५ मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद समाप्त करण्यात आली
III १९८६ मध्ये तामिळनाडू विधान परिषद समाप्त करण्यात आली
IV १९६९ मध्ये पंजाब विधान परिषद समाप्त करण्यात आली
V १९७१ मध्ये पश्चिम बंगाल विधान परिषद समाप्त करण्यात आली

अ.विधान I , II, III बरोबर

ब. विधान I , II, III, IV बरोबर

क विधान II, III, IV बरोबर

ड सर्व विधाने बरोबर
उत्तर
ब. विधान I , II, III, IV बरोबर

३.विधानसभेतील आमदारांच्या संख्येबाबत खालील विधानांचा विचार करा
I. हि संख्या ६० ते ५०० या दरम्यान असते
II. अरुणाचल प्रदेश , सिक्कीम , व गोवा या राज्यांसाठी ती ३० आहे
III.मिझोरम करिता ती ४० तर नागालँड करिता ४६ आहे
IV.सिक्कीम आणि नागालँड विधानसभेकारिता काही सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे घेतात
अ. विधान I , II ,III बरोबर

ब .विधान I,II,IV बरोबर

क. विधान II, III, IV बरोबर

ड वरील सर्व विधाने बरोबर
उत्तर
 ड वरील सर्व विधाने बरोबर

४.संविधानाच्या पाचव्या भागात कलम ------- ते ------ मध्ये संघ कार्य्पालीकेचे वर्णन केले आहे
अ. ५४,८०

ब ५२,७८

क ५६,६४

ड ५८,७६
उत्तर
ब ५२,७८

५. संघ कार्य पालिकेत खालील घटक असतात
I राष्ट्रपती
 II उपराष्ट्रपती
III प्रधानमंत्री
IV मंत्रिमंडळ
V महान्याय् वादी
अ.I ,II ,III,IV

ब. I ,III, IV ,V

क I ,III, IV

ड वरील सर्व
उत्तर
ड. वरील सर्व

६.७० वी घटनादुरुस्तीनुसार खालील कोणत्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेवू शकतात ?
अ. दिल्ली

ब. पुदुच्चेरी

क. वरील दोन्ही

ड. कोणतीही नाही
उत्तर
क वरील दोन्ही

७. खालील विधानांचा विचार करा
I राष्ट्रपती निवडणुकीसाठी रु. १५०००/- रक्कम अनामत म्हणून SBI मध्ये जमा करावी लागते
II जर एकून मतांच्या १/६ मते न मिळाल्यास अनामत रक्कम जप्त होते
अ.विधान I बरोबर आणि II चूक

ब.विधान II बरोबर आणि I चूक

क दोन्हीही विधाने बरोबर

ड दोन्हीही विधाने चूक
उत्तर
ब.विधान II बरोबर आणि I चूक

८ राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात
अ.पंतप्रधान

ब सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे

क. राज्यसभेच्या सभापतीकडे

ड लोकसभेच्या अध्यक्षांकडे
उत्तर
क. राज्यसभेच्या सभापतीकडे

९.कोणत्या राष्ट्रपतींनी दोनवेळा राष्ट्रपती पद धारण केले ?
अ. राजेन्द्रप्रसाद

ब. सर्वपल्ली राधाकृष्णन

क. नीलम संजीव रेड्डी

ड. व्ही. व्ही. गिरी
उत्तर
 अ. राजेन्द्रप्रसाद .

१०. आपल्या कार्यकाला दरम्यान कोणत्या राष्ट्रपतींचे निधन झाले?
अ.डॉ जाकीर हुसेन आणि व्ही व्ही गिरी

ब .डॉ जाकीर हुसेन आणि नीलम संजीव रेड्डी

क डॉ जाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद

ड सर्वपल्ली राधाकृष्णन आणि फक्रुद्दीन अली अहमद
उत्तर
क डॉ जाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा