प्रस्तावना
पृथ्वीचे अंतरंग हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या भागावर सर्व प्रकारच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :
शिलावरण
@ यालाच भूकवच असे म्हणतात
@ जाडी ४२ कि.मी.
@ २९ % जमीन व ७१ % पाणी
@ शीलावरणाचे दोन थर आहेत
१.सियाल
२.सायमा.
भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.
सियाल | सायमा | |
---|---|---|
जाडी (कि मी मध्ये ) | २९ | १३ |
घनता (ग्राम /घन सेमी ) | २.६५ ते २.७७ | २.८५ ते ३.३ |
'p' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) | ५.६ | ६ ते ७.२ |
's' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) | ३.२ | ३ ते 4 |
प्रावरण /मध्यावरण
पृथ्वीच्या एकूण घनफळ पैकी ८३ % घनफळ व वस्तुमानापैकी ६८ % वस्तुमान प्रावरणाने व्यापले आहे. या थराची जाडी २८६५ कि मी आहे
प्रावरणाचे दोन भाग आहेत
१. बाह्य प्रावरण
२.आंत प्रावरण
#बाह्य प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ४२ कि मी ते ७०० कि मी दरम्यान
-या आवरणाला मंद्गामी तरंगाचे शंकू म्हणतात
-शिलारसच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित
- पृथ्वीवर समस्थायी उपयोजन घडवून येण्यास कारणीभूत
#आंत प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ७००कि मी ते २८९० कि मी दरम्यान
- सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड सापडतात
गाभा
-भूपृष्ठापासून अंतरंगात २८९० किमी पासून ते ६३७१ कि मी पर्यंत पृथ्वीचा गाभा आहे
-गाभ्यात निकेल आणि लोह असते
-निकेल व लोह यांचे प्रमाण ८०:२०आहे
-पृथ्वीच्या एकून घनफळ पैकी १६ % घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२ % वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे
-गाभ्याची सरासरी घनता प्रावरणा च्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे.
-पृथ्वीच्या केंद्रावर तापमान २००० अंश सेल्सिअस असते तर दाब ३५ लाख वातावरणाच्या दाबा इतका असतो
-पृथ्वीच्या अंतर्भागात दर१०० मीटर खोलीवर तापमान ३ अंश सेल्सिअस ने वाढते
गाभ्याचे दोन भाग आहेत
१.बाह्य गाभा
२.आंतरिक गाभा
#बाह्य गाभा
@ अंतरंगात २८९० कि मी ते ५१५०कि मी पर्यंत
@ द्रवरूप
@ 's' भूकंप लहरी जावू शकत नाही
@घनता : १० ग्राम /घन से मी
#आंतरिक गाभा
@अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ कि मी पर्यंत
@घन अवस्थेत
@घनता : १३.३ ते १३.६ ग्राम /घन से मी
विलगता
विलगता | ज्या दोन थरांच्या दरम्यान आहेत ते थर | इतर |
---|---|---|
कॉनरॉड विलगता | सियाल व सायमा | |
मोहो विलगता | भूकवच व प्रावरण | 'p'भूकंप लहरींची गती एकदम कमी होते |
गटेमबर्ग विलगता | प्रावरण व गाभा | |
संक्रमण विभाग | बाह्य गाभा व आंतरिक गाभा | जाडी ४५० कि मी |
सरावासाठी प्रश्न
१.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
अ.सियाल
ब.निफे
क.सायमा
ड.शिलावरण
२.पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान -------- हि विलगता आढळते
अ.मोहो
ब.गटेनबर्ग
क.भू भौतिक
ड.संक्रमण विभाग
Savistar uttar dya
उत्तर द्याहटवा1). Prithvichya kendra bhag nife
उत्तर द्याहटवा2) moho vilgta
Pruthvicha antargabha kontya avasthet ahe
उत्तर द्याहटवापृथ्वीचा अंतगाभा काय म्हणून ओळखल्या जातो हे शोधायसाठी आलो होतो पण उत्तर मिळाले नाही
उत्तर द्याहटवा