प्रस्तावना
पृथ्वीचे अंतरंग हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या भागावर सर्व प्रकारच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात.
पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :
शिलावरण
@ यालाच भूकवच असे म्हणतात
@ जाडी ४२ कि.मी.
@ २९ % जमीन व ७१ % पाणी
@ शीलावरणाचे दोन थर आहेत
१.सियाल
२.सायमा.
भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.
| सियाल | सायमा | |
|---|---|---|
| जाडी (कि मी मध्ये ) | २९ | १३ |
| घनता (ग्राम /घन सेमी ) | २.६५ ते २.७७ | २.८५ ते ३.३ |
| 'p' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) | ५.६ | ६ ते ७.२ |
| 's' भूकंप लहरींचा वेग (कि मी /सेकंद) | ३.२ | ३ ते 4 |
प्रावरण /मध्यावरण
पृथ्वीच्या एकूण घनफळ पैकी ८३ % घनफळ व वस्तुमानापैकी ६८ % वस्तुमान प्रावरणाने व्यापले आहे. या थराची जाडी २८६५ कि मी आहे
प्रावरणाचे दोन भाग आहेत
१. बाह्य प्रावरण
२.आंत प्रावरण
#बाह्य प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ४२ कि मी ते ७०० कि मी दरम्यान
-या आवरणाला मंद्गामी तरंगाचे शंकू म्हणतात
-शिलारसच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित
- पृथ्वीवर समस्थायी उपयोजन घडवून येण्यास कारणीभूत
#आंत प्रावरण
-जाडी : भूपृष्ठापासून ७००कि मी ते २८९० कि मी दरम्यान
- सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साइड सापडतात
गाभा
-भूपृष्ठापासून अंतरंगात २८९० किमी पासून ते ६३७१ कि मी पर्यंत पृथ्वीचा गाभा आहे
-गाभ्यात निकेल आणि लोह असते
-निकेल व लोह यांचे प्रमाण ८०:२०आहे
-पृथ्वीच्या एकून घनफळ पैकी १६ % घनफळ व एकूण वस्तुमानापैकी ३२ % वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे
-गाभ्याची सरासरी घनता प्रावरणा च्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे.
-पृथ्वीच्या केंद्रावर तापमान २००० अंश सेल्सिअस असते तर दाब ३५ लाख वातावरणाच्या दाबा इतका असतो
-पृथ्वीच्या अंतर्भागात दर१०० मीटर खोलीवर तापमान ३ अंश सेल्सिअस ने वाढते
गाभ्याचे दोन भाग आहेत
१.बाह्य गाभा
२.आंतरिक गाभा
#बाह्य गाभा
@ अंतरंगात २८९० कि मी ते ५१५०कि मी पर्यंत
@ द्रवरूप
@ 's' भूकंप लहरी जावू शकत नाही
@घनता : १० ग्राम /घन से मी
#आंतरिक गाभा
@अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ कि मी पर्यंत
@घन अवस्थेत
@घनता : १३.३ ते १३.६ ग्राम /घन से मी
विलगता
| विलगता | ज्या दोन थरांच्या दरम्यान आहेत ते थर | इतर |
|---|---|---|
| कॉनरॉड विलगता | सियाल व सायमा | |
| मोहो विलगता | भूकवच व प्रावरण | 'p'भूकंप लहरींची गती एकदम कमी होते |
| गटेमबर्ग विलगता | प्रावरण व गाभा | |
| संक्रमण विभाग | बाह्य गाभा व आंतरिक गाभा | जाडी ४५० कि मी |
सरावासाठी प्रश्न
१.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो
अ.सियाल
ब.निफे
क.सायमा
ड.शिलावरण
२.पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान -------- हि विलगता आढळते
अ.मोहो
ब.गटेनबर्ग
क.भू भौतिक
ड.संक्रमण विभाग