> MPSC/UPSC: मुलभूत कर्तव्य

शुक्रवार, १० जून, २०१६

मुलभूत कर्तव्य

प्रस्तावना


                                नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि मुलभूत कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . परंतु मुल भारतीय राज्यघटनेत नागरिकांचे  मुलभूत कर्तव्य समाविष्ठ करण्यात आले नव्हते

४२ व्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे मुल कर्तव्य १९७६ मध्ये जोडण्यात आली

भारतीय संविधानात रुस च्या संविधानाने प्रभावित होवून हा भाग जोडण्यात आलास्वर्ण सिंह समिती

१९७६ मध्ये या समितीची स्थापना मुल कर्तव्य आणि आवश्यकता याबाबत शिफारशी करण्याकरिता करण्यात आली

या समितीच्या शिफारशीनुसार ४२ व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानात भाग IV क जोडण्यात आला त्यात एकमेव कलम ५१ क मध्ये नागरिकांचे १० मुलभूत कर्तव्य जोडण्यात आले

स्वर्ण सिंह समितीने आठ मुलभूत कर्तव्य सुचविले होते. त्यापैकी ३ नाकारण्यात आले.

५१ क  मधील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी

१.भारतीय संविधान , राष्ट्रगीत , आणि राष्ट्र ध्वज यांचा आदर करावा

२.स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झालेल्या राष्ट्रीय आंदोलनातील उच्च आदर्शांचे पालन करावे

३.भारताचे  सार्वभौमत्व, ऐक्य , आणि अखंडता यांचे संरक्षण करावे

४.देशाचे संरक्षण करावे तसेच गरजेच्यावेळी देशाची सेवा करावी

५.धर्म, भाषा  आणि प्रांत यांसारख्या भेदभावांना दूर करून देशातील नागरिकांत एकता व बंधुभाव वाढीस लावण्याचे प्रयत्न करणे विशेषतः महिलांप्रती असलेल्या वाईट प्रथांचा त्याग करणे

६. आपल्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगावा तसेच संस्कृतीचे रक्षण करणे

७. प्राकृतिक पर्यावरण , वन्य जीव यांचे संरक्षण करावे तसेच प्राणी मात्रांप्रती दयाभाव ठेवावा

८.मानवता,वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करावा

९. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे तसेच हिंसेचे समर्थन करू नये

१०.सामुहिक आणि वैयक्तिक कार्यात सतत विकासाचा दृष्टीकोन ठेवावा

११.६ ते १४ वयोगटातील पाल्यास पालकाने शिक्षण द्यावे (सदर कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले)

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा