> MPSC/UPSC: राज्यशास्त्र प्रश्न संच ७

सोमवार, २९ मे, २०१७

राज्यशास्त्र प्रश्न संच ७






१. वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अपराधासाठी खालील शिक्षा आहे ?
      
अ .किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २५००० रु दंड

ब .किमान १ वर्ष ते कमाल ७ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २५००० रु दंड

क.किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान १००० रु. ते २५००० रु दंड

ड .किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्ष तसेच किमान २००० रु. ते २०००० रु दंड

उत्तर
ब. किमान १ वर्ष ते कमाल ७ वर्ष तसेच किमान २००० रु ते २५००० रु दंड 

२. वन संवर्धन कायदा १९८० नुसार अपराधासाठी खालील शिक्षा आहे?

अ. १ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही

ब .१ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड

क .२ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड

ड .२ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही
उत्तर
अ .१ वर्षापर्यंत कैद किंवा २००० रु दंड किंवा दोन्हीही 

३.हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९८१ नुसार जर औद्योगिक प्रदूषके हवेत सोडल्यास १८ महिने ते ६ वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आहे. शिक्षा झाल्यानंतरही जर अशी कृती चालू राहिल्या प्रतिदिनी - - -  -- रुपये दंड होतो 
अ. १०००

ब. 2000

क. ५000

ड. ४०००
उत्तर
क.५०००

४.केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाची स्थापना कधी झाली ?

अ. १९५०

ब .१९८०

क.१९९४

ड .१९८५
उत्तर
ड.१९८५

५.खालील विधानांचा विचार करा 
I.पर्यावरण संरक्षण अधिनियम,१९८६ संपूर्ण भारतासाठी लागू आहे.
II.ग्राहक संरक्षण अधिनियम , १९८६ संपूर्ण भारतासाठी लागू आहे 

अ .फक्त विधान I बरोबर

ब .फक्त विधान II बरोबर

क .दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ.फक्त विधान I बरोबर कारण ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ जम्मू आणि काश्मीर या राज्यासाठी लागू नाही 

६.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंबलबजावणी झाली नाही तर एखाद्या व्यक्तीला किती शिक्षा होवू शकते ?
अ .२ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड

ब.३ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड

क.५ वर्षापर्यंत कारावास आणि /व २० कोटी रुपये दंड

ड .२ वर्षापर्यंत कारावास आणि /व २० कोटी रुपये दंड
उत्तर
 ब . ३ वर्षापर्यंत कारावास आणि /व १० कोटी रुपये दंड 

७ .राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अध्यक्षाशिवाय  किती सदस्य असतात ?

अ १५

ब .किमान १० व कमाल २०

क.किमान १० व कमाल १५

ड.किमान १५ व कमाल २०
उत्तर
ब. किमान १० व कमाल २०

८.केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची वर्षातून कमीत कमी किती बैठका होणे आवश्यक आहे ?

अ .एक

ब .दोन

क.तीन

ड .चार
उत्तर
अ .एक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा