> MPSC/UPSC: ऑगस्ट 2014

रविवार, १० ऑगस्ट, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच ५



१. भारतीय राज्य घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश भाग चार मधील कलम ३६ ते ५१ मध्ये करण्यात आला आहे. त्यातील कलम ३६ कशाशी संबंधित आहे ?
 

अ. पर्यावरण

ब . राज्याची संकल्पना

क. प्राथमिक शिक्षण

ड. ग्रामपंचायत

उत्तर
ब. राज्याची संकल्पना

२.खालील कोणत्या घटनादुरुस्तीने मार्गदर्शक तत्व या भागात बदल केले नाही ? 

अ. ४२ व्या

ब. ४४ व्या

क. ८६ व्या

ड. ९२ व्या
उत्तर
ड ९२ व्या

३. खालील कोणती घटनादुरुस्ती अशी आहे जिच्यामुळे  मुलभूत अधिकार किंवा  मार्गदर्शक तत्त्व यापैकी फक्त एकातच दुरुस्ती झालेली आहे?

अ.४२ वी

ब. ४४ वी

क. ८६ वी

ड. यापैकी नाही

उत्तर
ड यापैकी नाही  

४.खालील विधानांचा विचार करा
I मुलभूत अधिकारांचा उद्देश्य लोकशाही राजकीय  व्यवस्था निर्माण करणे हा आहे
II मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश्य सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणे हा आहे. 

अ.विधान I बरोबर

ब.विधान II बरोबर

क.विधान I व II बरोबर

ड.विधान I व II दोन्हीही चूक
उत्तर
क विधान I व II बरोबर

५. १९८७ मधील विधिक सेवा प्राधिकरण अधिनियमानुसार गरीब व्यक्तींना मोफत न्यायिक सहाय्यता मिळते सदर अधिनियम घटनेतील कोणत्या कलमानुसार निर्मिला गेला?

अ.४०

ब.४५

क.५०

ड.३९ क
उत्तर
ड ३९ क सदर कलम ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले आहे

६.भारतीय घटनेतील भाग ४ सोडून असे कोणते कलम आहे जे राज्याला मार्गदर्शन करते?

अ.कलम ३२५

ब.कलम ३५० क

क. कलम ३५१

ड. वरील सर्व
उत्तर
 ड वरील सर्व ,
कलम ३२५ राज्याला अनुसूचित जाती आणि जमाती करिता नोकर भरती बाबत मार्गदर्शन करते
कलम ३५० क राज्याला भाषिक अल्पसंख्याक वर्गातील जनतेक रिता प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याकरिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता मार्गदर्शन करते
कलम ३५१ राज्याल हिंदी भाषा विकासाकरिता व्यवस्था करण्याकरिता मार्गदर्शन करते

७.भारतीय राज्यघटनेतील असा कोणता भाग आहे जो एका समाजवादी राज्यघटनेतून घेतला आहे

अ.मुलभूत अधिकार

ब.मार्गदर्शक तत्त्व

क.मुल कर्तव्य

ड.नागरिकत
उत्तर
क मुल कर्तव्य , जे रशियन राज्यघटने तून घेतले आहे  

८. भारतीय राज्य घटनेत किती कलमांत मुल कर्तव्यांचा उल्लेख आहे

 अ.एक

ब. अकरा

क.दहा

ड. सात
उत्तर
अ एक , कलम ५१ क   

९.स्वर्णसिंग समितीने -------- मुलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस केली होती पण ४२ व्या घटनादुरुस्तीने ------- मुलभूत कर्तव्य जोडण्यात आले

अ.८ ,१०

ब.१० , ८

क.८,८

ड.१०, १०
उत्तर
अ ८ ,१०

 १०.खालील विधानांचा विचार करा
I सर्व मुलभूत अधिकार भारतीय आणि विदेशी नागरिकांकरिता आहे
II मुल कर्तव्य हे फक्त भारतीयांकरिता आहेत ते विदेशी नागरिकांना नाही

अ.फक्त I बरोबर
ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड.दोन्हीही चूक
उत्तर
ब फक्त II बरोबर , काहीच मुलभूत अधिकार विदेशी नागरिकांना लागू होतात सर्व नाही  
 




 

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

भूगोल प्रश्नसंच ५




१. भारताचे स्थान -------- व ---------- गोलार्धात आहे
 

अ .उत्तर व पश्चिम

ब .उत्तर व पूर्व

क .दक्षिण व पूर्व

ड .दक्षिण व पश्चिम

उत्तर
ब उत्तर व पूर्व

२. कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ. ६०

ब. ३०

क.४५

ड. १५
उत्तर
क ४५ 

३.लेह येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ.१२०

ब.२४०

क.३६०

ड.१८०

उत्तर
ब २४० 

४.अरुणाचल प्प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला गुजरात मधील घुअर मोटा येथील सुर्योदायातील वेळेचा फरक सुमारे ------- मिनिटाचा आहे.

 अ.११६

ब.१२६

क.१३६

ड.१४६
उत्तर
अ ११६

५. -------- महासागर हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले गेले आहे

अ.अटलांटिक

ब. आर्टिक

क.हिंदी

ड.प्रशांत
उत्तर
क हिंदी  

६.जम्मू आणि काश्मीर या राज्याची सीमा किती देशांशी जोडली आहे

अ.२

ब.3

क.४

ड.१
उत्तर
 क ४ 

७.असे देश किती आहेत ज्यांची सीमा भारतातील चार राज्यांशी जोडलेली आहे

अ.३

ब.४

क.२

ड.१
उत्तर
अ३

८. बिहार राज्याला कोणत्या देशाची सीमा जोडली आहे

 अ.नेपाल

ब. भूतान

क.चीन

ड. अ आणि ब दोन्हीही
उत्तर
अ नेपाल  

९.हिमालय पर्वत रागांचा गाभा ---- खडकांनी बनलेला आहे

अ.कणाश्म

ब. अग्निज

क.स्थरित

ड.रूपांतरित
उत्तर
अ कणा श्म

 १०.

अ.
ब.

क.

ड.
उत्तर
ब पारस-परळी -एकलहरे -कोरडी